Posts

लोहगड किल्ला

Image
हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. विंचूकाटा पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील मळवली स्थानकापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. रेल्वेस्थानकाच्या फलाटावर लोहगड विसापूर या जोडकिल्ल्यांची रेल्वेने मुळी पाटी लावून जाहिरातच केलेली आहे. त्यावर लिहिलयं -“लोहगड, विसापूर फोर्ट-किल्ले” मळवली स्थानकबाहेर पडल्यानंतर नव्या द्रुतगती महामार्गावरील पुल ओलांडून पलिकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर भाजे गाव येते. येथून एक पायऱ्यांचा मार्ग भाग्याच्या लेण्यांकडे जातो. तर दुसरी गाडीवाट लोहगडाच्या पायथ्याशी अ...