भाजे लेणी

एकूण बावीस लेण्यांचा हा समूह. एक चैत्यगृह, एक स्तूपसमूह आणि इतर २० विहार. भाजे लेण्यांचा काळ सुरु होतो ते इ.स. पूर्व २ र्‍या शतकात आणि त्याचे अखेरचे बांधकाम होते ते इ.स. ६ व्या शतकात. सर्वात ठळकपणे दिसणारे लेणे म्हणजेच चैत्यगृह. नेहमीप्रमाणे दिसणारी पिंपळपानाकृती कमान येथेही दिसत आहेच. बाजूलाच यक्षिणीचे शिल्पही कोरलेले दिसतेय. कमानीच्या बाजूलाच आणि वर गवाक्षांच्या माळा, कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, कातळात खोदलेल्या कडय़ा सर्व काही दिसतेय. तो भव्य देखावा जणूकाही अंगावरच येतोय.
चैत्यगृहाची रचना नेहमीसारखीच -अष्टकोनी खांब व मध्ये गुळगुळीत स्तूप. पण इथे मात्र थोडेसे वेगळे दिसतेय. अष्टकोनी खांब आहेत पण ते सरळ उभे न ठेवता कललेले ठेवलेले आहेत जणू ते छताच्या ओझ्याने वाकलेले आहेत. खांबावर कमळ, चक्र कोरलेले दिसतेय. एका खांबावर खुंटी व तिला लटकवलेला हारही मोठ्या नजाकतीने कोरलेला दिसतोय.




 इथेही छतावर २००० वर्षांपूर्वी घातलेले लाकडी फासळ्यांचे आवरण अजूनही शाबूत दिसतेय. बावीस अर्धवर्तुळाकार तुळयांनी बावीस खांब जोडलेले आहेत तर अकरा पाववर्तुळाकार तुळया स्तूपाच्या वर एकाच बिंदूत सांधल्या गेल्या आहेत. अतिशय नाजूक तरीही भव्यदिव्य असेच ते दृश्य दिसतेय. मधोमध गोलाकार स्तूप त्यावर हर्मिका पण इथे मात्र हर्मिकेवरील लाकडी छत्र दिसत नाहीये. वाटोळा स्तूप झिलईकामाने गुळगुळीत केलाय हा लेण्यांवरील मौर्यकलेचा प्रभावच.
लाकडी तुळयांनी केलेली नक्षीदार कमान
लाकडी तुळयांनी केलेली नक्षीदार कमान





























 चैत्यगृहाच्या भव्यदिव्यपणाने विस्मित होउन बाहेर येतोय आणि पावले विहारांकडे वळताहेत. काही दुमजली विहार दिसत आहेत. काही अगदीच साधे दिसत आहेत तर काही कलाकुसरीने सालंकृत केले दिसताहेत. दरवाजे, खिडक्या, झोपण्याचे ओटे तर काही विहारांत अगदी ओट्यांच्या बाजूला वस्तू ठेवण्यासाठी कप्पेही खोदल्याचे दिसत आहेत.




 अगदी भरपूर संख्येने येथे विहार दिसत आहेत.
सुरुवातीच्या एका विहारावर शिलालेख कोरलेला दिसत आहे.
'बाधया हालिकजयाना दानं'
बाध या शेतकर्‍याच्या बायकोचे दान. म्हणजे अगदी आपल्यासारख्या सामान्य जनांनीही पण ही अप्रतिम लेणी बांधायला मदत केलेली दिसत आहे.
 थोडे पुढे येताच दोन थंडगार पाण्याची टाकी खोदलेली दिसत आहेत. वर शिलालेख आहेच
‘महारठी कोसिकीपुत विण्हुदत दानं’
महाश्रेष्ठी कोसिकीपुत्र विण्हुदत्त याने हे टाके खोदलेले आहेत. आजचा शेठजी हा शब्द पूर्वीच्या श्रेष्ठी याचा अपभ्रंश.

 थोडे पुढे एका गुहेत स्तूपांचे एक संकुलच तयार केलेले दिसत आहे. एकूण १४ स्तूप येथे कोरलेले दिसत आहेत. मान्यवर बौद्ध भिक्षूंची ही स्मारकेच. यातल्या काही स्तूपांवर त्यांची नावेही कोरलेली आहेत. एकदमच वेगळे आणि वैविध्याने भरलेले असे हे लेणे दिसत आहे.

आता तिथून थोडे पुढे जात आहे. आता पोचतोय ते भाजे लेण्याच्या प्रसिद्ध सूर्यगुंफेकडे.
व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी याची रचना. आतले दालन कड्याकुलपांनी बंद केलेले आहे पण वरांड्यात मात्र अप्रतिम कोरीव कलेची खाणच दिसत आहे. सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम यांनी ही गुंफा भारून गेली आहे. यातली सगळ्यात ठळक दिसतोय तो सूर्य-इंद्राचा देखावा. चार घोड्यांच्या रथात सूर्य स्वार होउन चालला आहे. त्याच्या बाजूला आहेत त्याच्या पत्नी संज्ञा व छाया. एकीच्या हातात छ्त्र तर दुसरीच्या हातात चामर. रथाखाली तुडवला गेलेला असुर दिसत आहे. असुर म्हणून त्याचे पायही वळलेले दिसताहेत. रथामागे बकर्‍या, तसेच इतर प्राणी आणि सैनिकही दिसत आहेत.
रथाखाली तुडवला गेलेला, पाय वक्र असलेला असुर.
रथाखाली तुडवला गेलेला, पाय वक्र असलेला असुर.
 दुसर्‍या बाजूला हत्तीवर आरूढ असलेल्या इंद्राचे शिल्प दिसत आहे. गळ्यात फुलांची माळ, हाती अंकुश दिसतोय. इंद्राच्या पाठीमागे हाती ध्वज धरून दास बसलेला दिसतोय. हत्तीने सोंडेत झाड पकडलेले दिसत आहे. त्यावरील फांद्या, पानेही स्पष्ट दिसत आहेत. आजूबाजूला लहानमोठ्या शिल्पकृतींचा अक्षरशः खचच पडलेला दिसत आहे. एक अश्वमुखी स्त्री, एक तबला वाजवणारी तर एक नर्तिका येथे दिसत आहे. आजूबाजूलाच अनेक वादक कलाकारही दिसताहेत. साग्रसंगीत असाच हा देखावा आहे.
गजारूढ इंद्र
गजारूढ इंद्र

हत्तीच्या सोंडेत असणारे झाड
हत्तीच्या सोंडेत असणारे झाड

नर्तिका, तबला व इतर वाद्ये वाजवणारे वादक
नर्तिका, तबला व इतर वाद्ये वाजवणारे वादक


पण बौद्ध लेण्यांमध्ये सूर्य -इंद्राचे काय काम? काही तज्ज्ञांच्या मते रथारूढ देवता साक्षात बुद्ध असून गजारूढ शिल्प हे बुद्धशत्रू 'मार' याचे आहे. २ सुंदर शिल्पांचा असा अर्थ लागताच क्षणात त्याचे युद्धशिल्पांत रूपांतर होतेय.
समोरच्या भिंतीवर खालील बाजूस ग्रीक दंतकथांतील पात्रे कोरलेली दिसत आहेत. शरीर घोड्याचे व मुख मानवाचे अश्या ह्या ग्रीक उपदेवता 'सेंटोर'च्या प्रतिमाच. काही शिल्पाकृतींमध्ये पंख असलेले घोडे कोरलेले आहेत. ही ग्रीक पद्धतीची शिल्पे म्हणजेच २२०० वर्षांपासून चालू असलेल्या समुद्र उल्लंघून चालत असलेल्या व्यापाराचा व त्याद्वारे इकडे तिकडे पसरलेल्या संस्कृतीचा ढळढळीत पुरावाच.
पंख असलेले घोडे व सेंटोरच्या शिल्पाकृती
पंख असलेले घोडे व सेंटोरच्या शिल्पाकृती

पंख असलेले घोडे व सेंटोरच्या शिल्पाकृती
पंख असलेले घोडे व सेंटोरच्या शिल्पाकृती


बाहेरून सूर्यगुंफा अशी दिसते
बाहेरून सूर्यगुंफा अशी दिसते















Comments

Popular posts from this blog

माहुली किल्ला

लोहगड किल्ला