Posts

Showing posts from August, 2017

माहुली किल्ला

Image
माहुली किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड. इतिहास : इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली हे ज्ञात नाही. पण १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजाम शाहीच्या संस्थापक असलेल्या मलिक अहमद याच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. १६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर- शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान आहे म्हणजे महाब...

इरशाळगड किल्ला

Image
इरशाळ गड किल्ला (Irshalgad Fort) – ३७०० फूट उंचीचा इरशाळ गड किल्ला हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीन समजला जातो. इरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे. पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते. इरशाळ गड किल्ला   इतिहास : तसे म्हटले तर या इरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे कारण इरशाळ हा एक सुळकाच आहे. त्यामुळे इतिहासातही त्याचा फार असा कुथे उल्लेख नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. इरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. इरशाळ ...