इरशाळगड किल्ला
![]() |
इरशाळ गड किल्ला |
हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत कठीन समजला जातो.
इरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे. पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते.
![]() |
इरशाळ गड किल्ला |
![]() |
इरशाळ गड किल्ला |
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माची पासून गडावर जातांना, वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत. तेथून पुढे सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडपाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगद हा परिसर दिसतो.
इरशाळावाडीत ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गडावर जेवणाची सोय नाही, स्वःताच जेवणाची सोय करावी लागते. मार्च पर्यंतच गडावरील टाक्यात पाणी असते इतर वेळी स्वतः पाण्याची सोय करावी लागते. जाण्यासाठी इरशाळवाडीतून एक तास लागतो.
सूचना :अतिकठीण (गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे) १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment